Uddhav Thackeray: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत विविध प्रश्नांवर भाष्य केलं आहे. दरम्यान याच मुलाखतीच्या दुसऱ्या भागात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे. “मी सल्ला देतो आहे टोमणा मारत नाही त्यांनी ऐकायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे”, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.