Pitbull Attack 11 year Old Boy In Mankhurd, Mumbai Viral Video: मुंबईतील मानखुर्द परिसरात १७ जुलै रोजी हमजा नामक एका ११ वर्षांच्या चिमुकल्यावर एका पिटबुल श्वानाने हल्ला केला आहे. आश्चर्य म्हणजे यावेळी श्वानाचा ४३ वर्षीय मालक मोहम्मद सोहेल हसन हा स्वतः तिथे उपस्थित होता मात्र त्याने आपल्या श्वानाला अडवण्याऐवजी आक्रमक करण्याचा प्रयत्न केला व त्याहीउपर तो पूर्ण व्हिडिओमध्ये हसताना दिसत होता. या प्रकरणी आता ११ वर्षीय चिमुकल्याच्या वडिलांच्या तक्रारीवरून ४३ वर्षीय मोहम्मदवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.