माणिकराव कोकाटे यांनी आज (२२ जुलै) पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत कोकाटे राजीनामा देतील का? याबद्दल तर्क व्यक्त केले जात होते. मात्र कोकाटे यांनी राजीनामा दिलेला नाही.तसा विचारही नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच सभागृहातील कथित ऑनलाइन रमीच्या डावावर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, “मी रमी खेळत नव्हतो. मला रमी खेळता येत नाही. मी फोन सुरू केला आणि त्यावर गेम सुरू झाला. फोन नवीनच असल्यामुळे मला तो गेम स्किप करता आला नाही. तेवढ्यात कोणीतरी त्याच्या व्हिडीओ चित्रीत केला आणि अधिवेशन संपल्यावर व्हायरल केला.”