कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज नाशिक दौऱ्यावर असताना त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पत्ते दाखवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. त्यानंतर पोलिसांनी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात. गेल्या काही दिवसांपासून कोकाटे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. अशातच्या रमी खेळतानाच्या त्यांच्या व्हिडीओने एकच वादंग सुरू झाला आहे.