Ladki Bahin Yojna July 2025 Installment: गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे संपूर्ण वर्षाचे १२ लाभ दिले गेले आहेत. या योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र अद्याप बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. हा लाभ या महिनाअखेरपर्यंत अथवा पुढील महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मिळेल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. लाडक्या बहिणींचे हे एक प्रकारे मासिक वेतन आहे. ते महिनाअखेर किंवा ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत देण्याचे नियोजन केले जात असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.