Kalyan:कल्याणमधील नांदिवली गावातील श्री बाल चिकित्सालय रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरुणीला सोमवारी सायंकाळी एका परप्रांतीय तरुणाने अमानुष मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ मंगळवारी समोर आला. नांदिवली गावातील श्री बाल चिकित्सालय रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट केल्याचे व्हिडीओत दिसत होते. या मारहाणीनंतर सदर आरोपी फरार होता. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्या आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले. आज त्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं. कल्याण न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.