Nagpur 58 Year Old Women Killed By Son in Law: मुख्यमंत्री फडणवीसांच्या शहरात गुन्ह्याची टक्केवारी दिवसागणिक वाढत आहे.बुधवारी २३ जुलै २०२५ ला सुद्धा एका ५८ वर्षीय महिलेची शहरातील प्रसिद्ध ठिकाणी गळा चिरून हत्या करण्यात आली. बुधवारी दुपारी शहरातील पॉश सिव्हिल लाईन्स परिसरातील इंदिरा कॉन्व्हेंट स्कूलजवळ रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह आढळला. जवाहर कॉलनीतील घरकाम करणारी माया पासेरकर (५८) असे मृत महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, माया यांनी पतीच्या वैद्यकीय उपचारांसाठी जावई खान यांच्याकडून हप्त्यांमध्ये ५ लाख रुपये उधार घेतले होते. मात्र त्यानंतर घराचं भाडं आणि किराणा भरण्यासाठी सुद्धा खानकडे पैसे उरले नव्हते; शिवाय त्याला आणखी कर्ज मिळतही नव्हते. सासूने पैसे घेऊन परत केले नसल्याच्या रागातून त्याने या हल्ल्याचे नियोजन केले.