जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेल्या नळपाणी योजनेचा कंत्राटदार हर्षल पाटील याने शेतात गफास घेऊन मंगळवारी आत्महत्या केली. शासनाकडे सुमारे दीड कोटीचे देयक थकीत असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याचा दावा राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांनी केला आहे. हर्षलच्या या आत्महत्येनंतर पुन्हा राजकारण तापल्याचं चित्र असून विरोधकांनी याबाबत आता सरकारलाच जाब विचारायला सुरूवात केली आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊ