३,००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि येस बँकेशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी छापे टाकले. ५० कंपन्या आणि सुमारे २५ व्यक्तींचा समावेश असलेल्या मुंबई आणि दिल्लीतील ३५ हून अधिक ठिकाणांवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) छापे टाकण्यात येत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं.