Rohit Pawar:आमदार रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून आक्रमकपणे सरकारवर टीका करत आहेत. गेल्या आठवड्यात विधिमंडळाचे अधिवेशन आणि त्यानंतरही त्यांनी सरकार व मंत्र्यांवर काही आरोप केले होते. तसेच अधिवेशन संपल्यानंतर रोहित पवार यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहात कथितपणे मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यावर रोहित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथे पार पडलेल्या कार्यक्रमात भाष्य केलं.