Rohini Khadse Husband Pranjal Khewalkar Arrested In Rave Party: पुणे शहरातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये रेव्ह पार्टी केल्याप्रकरणी गुन्हे शाखेकडून छापा टाकण्यात आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेत्या अॅड. रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने टाकलेल्या या छाप्यात कोकेन, गांजा यासह इतर अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. प्रांजल खेवलकर यांच्यासह या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये सात पुरुष आणि दोन महिलांचा सहभाग आहे.