Who Is Pranjal Khewalkar, Rohini Khadse Husband, Eknath Khadse Son In Law Arrested: एकनाथ खडसे यांचे जावई, रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुण्यातील खराडी परिसरातील एका सोसायटीमध्ये रेव्ह पार्टी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. रोहिणी खडसे यांच्या हडपसर इथल्या बंगल्यावरही छापा टाकण्यात आल्याने या प्रकरणाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने टाकलेल्या या छाप्यात कोकेन, गांजा यासह इतर अमली पदार्थही जप्त करण्यात आले आहेत. प्रांजल खेवलकर यांच्यासह या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये सात पुरुष आणि दोन महिलांचा सहभाग आहे. या प्रकरणात सत्ताधाऱ्यांकडून आता खडसे यांना लक्ष्य केलं जात असताना रोहिणी खडसे यांचे पाटील प्रांजल खेवलकर आहेत कोण याचेही अनेकांना कुतूहल आहे. प्रांजल खेवलकर यांचा व्यवसाय, रोहिणी खडसेंशी लग्न, यापूर्वीची वादग्रस्त प्रकरणे याचा आढावा या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत.