Sanjay Raut: शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काल (२७ जुलै) वाढदिवस होता. त्यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर आता खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे.