Rohini Khadse खराडी येथील एका हॉटेलमधील खोलीत सुरू असलेल्या पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री छापा घालून केलेल्या कारवाईत अमली पदार्थ, दारू, हुक्का याचे सेवन केले जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणींसह सात जणांना अटक केली. त्यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयाचाही समावेश आहे. अटक आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. याप्रकरणी आता खेवलकर यांच्या पत्नी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.