Navi Mumbai Marathi vs Hindi Controversy: खारघर येथे एक परप्रांतीय व्यक्ती येथे पिठाची गिरणी चालवतो. मात्र, दुकानाची पाटी त्याने हिंदीत लावून ठेवली आहे. मागील अनेक दिवसांपासून मराठी व्यक्तींनी त्याला पाटी मराठीत करण्यासंदर्भात वारंवार सूचना केल्या होत्या. मात्र, त्याने पाटी न बदलता उलट उडवाउडवीची उत्तरं दिली. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मनसे यावर आक्रमक झाली असून, या परप्रांतीय तरुणाला माफी मागायला लावली आहे, तसेच हिंदी मध्ये असलेला बोर्ड मराठी मध्ये देखील लावायला सांगितला आहे.