Pimpari High Society Man Beats Teens Over Dispute: पुण्यातील गहूंजे येथील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोढा सोसायटीत ही घटना घडलीये. या मारहाणीचा व्हिडीओ सुद्धा समोर आलाय. या प्रकरणी शिरगाव पोलीस स्टेशनमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून भेगडेला बेड्या ठोकण्यात आल्यात. काल सोसायटीच्या क्लब हाऊसमध्ये किशोर भेगडेचा मुलगा आणि त्याचे मित्र खेळत होते. खेळता-खेळता अगदी क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाले. हे वडील भेगडेला समजले मग त्याने मुलाच्या मित्रांना गाठले अन त्यांना बेदम मारहाण केली.