संसदेच्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. बुधवारी राज्यसभेत पार पडलेल्या चर्चेत खासदार संजय राऊत यांना चार मिनिट बोलण्याचा वेळ दिला. यावेळी संजय राऊतांनी खोचक शब्दांत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं. पहलगाम हल्ल्यावेळी सुरक्षेत चूक झाल्याचं तिथल्या राज्यपालांनी मान्य केलं. मग याची जबाबदारी कोण घेणार? राजीनामा कोण देणार? पंडित नेहरू की डोनाल्ड ट्रम्प? असा सवाल
राऊतांनी केला.