मालेगाव येथे २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्याचा एनआयए कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालय आज निकाल देणार आहे. त्यामुळे, देशातील दहशतवादाशी संबंधित दीर्घकाळ चाललेल्या खटल्यांपैकी एक असलेल्या या खटल्यातून भाजपच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींची सुटका होणार की त्यांना दोषी ठरवले जाणार, हे ठरणार आहे.या पार्श्वभूमीवर प्रकरणातील आरोपी समीर कुलकर्णी, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांनी निर्दोश मुक्ततेबाबत विश्वास व्यक्त केला आहे.