नांदेड शहरात भरदिवसा एका तरुणीला जबरदस्तीने उचलून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. नांदेड रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची तातडीने दखल घेतली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच अपहरण झालेल्या तरुणीची सुटका करण्यात आली. या प्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं