शिरपूर तालुक्यात वीज महामंडळाने एका झोपडीत वास्तव्य करणाऱ्या व 1 लाईट आणि 1 पंखा वापरणाऱ्या 70 वर्षीय महिलेला तब्बल 82 हजार 100 रुपयांचे वीज बिल दिले. गेल्या महिन्याभरापासून महामंडळाकडे लेखी तक्रार केल्यानंतर सुधारणा करण्याऐवजी जुलै महिन्याचे 1 हजार 160 रुपये बिल जोडून 83 हजार 260 रुपयांचे वीज बिल पाठविण्याचा नवा विक्रम करण्यात आला. त्याविरोधातही लेखी तक्रार देण्यात आली आहे.