Red Soil Stories या प्रसिद्ध युट्युब चॅनेलचे क्रिएटर शिरीष गवस यांचे मेंदूच्या ट्युमरमुळे दुःखद निधन झाले आहे. कोकणातील प्रसिद्ध जोडी पूजा व शिरीष गवस यांच्या चॅनेलला तब्बल २ लाखाहून अधिक लोकांनी सबस्क्राईब केले होते. लॉकडाऊन काळात त्यांनी कोकणातील पारंपरिक रेसिपी दाखवत या चॅनेलला सुरुवात केली होती. शिरीष यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.