Panvel Night Riders Bar Attacked By MNS Workers After Raj Thackeray Speech: शनिवारी शेकापच्या वर्धापनदिन सोहळ्यात पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असणाऱ्या रायगड जिल्ह्यात अनधिकृत डान्सबारांच्या वाढत्या संख्येवर जोरदार टीका केली होती. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा. महाराजांचा राज्यकारभार ज्या किल्ल्यांवरून चालला त्या किल्ल्यावरून या जिल्ह्याला नाव पडले. असे असताना रायगडची ओळख आता डान्सबारचा जिल्हा अशी होऊ लागल्याची टीका राज ठाकरे यांनी केली होती. यानंतर याच्या १२ तासांच्या आत पनवेलमधील नाईट रायडर्स या बारवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे.