Panvel Ladies Bar Attacked By MNS Worker: शनिवारी शेकापच्या वर्धापनदिन सोहळ्यात पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असणाऱ्या रायगड जिल्ह्यात अनधिकृत डान्सबारांच्या वाढत्या संख्येवर जोरदार टीका केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत, जिथे बार बंद असावेत अशी अपेक्षा, तिथे अनधिकृत डान्सबार कसे सुरू राहतात, असा थेट सवाल त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. राज ठाकरे यांनी इशारा देऊन दहा तास उलटत नाही तेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जुन्या मुंबई पुणे महामार्गावर असलेल्या लेडीज बारवर हल्लाबोल सुरू केला.