Mahadevi Madhuri Elephant Likely To Return In Kolhapur: कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आणि सध्या राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या महादेवी माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेष पदयात्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सुरू केली आहे. त्याला सामान्य जनता, सर्वपक्षीय नेत्यांनी, महादेवीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी चांगला प्रतिसाद नोंदवला. कोल्हापूर जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधींनी माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरू केली आहे. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सह्यांची मोहीम राबवण्यास सुरु केली आहे.