Mumbai Western Railway Passenger Brakes TC Office: पश्चिम रेल्वेवरील बोरिवली स्थानकातील तिकीट तपासणी कार्यालयातील मालमत्तेचे विनातिकीट प्रवाशाने नुकसान केले. मॉनिटर, सीपीयू, कीबोर्डची तोडफोड केली. तसेच, या भांडणात रेल्वे कर्मचारी आणि स्वतः प्रवासी जखमी झाला. सदर विनातिकीट प्रवाशाला पुढील कारवाईसाठी रेल्वे पोलिसांच्या हवाली करण्यात आले.