Gotya Gitte Threatens In Viral Video: महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार असलेला संशयित आरोपी गोट्या गित्तेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गोट्या गित्तेने थेट रेल्वे रुळावर बसून आत्महत्येचा इशारा दिला आहे. गोट्या गित्ते असंही म्हणाला की, वाल्मिक कराड म्हणजे साक्षात विठ्ठलाचा अवतार आहे. याच व्हिडिओतून गोट्याने आमदार जितेंद्र आव्हाडांना सुद्धा धमकी देत तुम्ही माझ्यावर आरोप करणे थांबवले नाहीतर आत्महत्या कारेन असं म्हटलं आहे.