Pune Atrocity Matter Protest: छत्रपती संभाजीनगर येथील एक तरुणी सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात आली होती. तर त्या तरुणीला कोथरूड येथील तीन तरुणींनी त्यांच्या फ्लॅटमध्ये एक दिवस राहू दिले. त्यानंतर ती तरुणी तेथून निघून गेली. त्याच दरम्यान त्या तरुणीच्या सासरच्या मंडळींनी सून हरवल्याची तक्रार दिल्यानंतर कोथरूड पोलिसांनी या तिघींना पोलिस स्टेशनमध्ये जबाब नोंदविण्यास आणण्यात आले. दरम्यान दोन दिवस तपासाच्या नावाखाली तरुणींना त्रास देण्यात आला असून या तिघींशी बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी जातीवाचक भाषा वापरली असा आरोप केला जातोय. या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी पोलिस आयुक्त कार्यालयाच्या आवारात तरुणींनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.