भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सविस्तर उत्तर देताना, दिल्लीतील लोकांना या प्रवृत्तींना खतपाणी घालू नये असं म्हटलं. हा मराठी माणसाच्या अस्तित्त्वाचा विषय आहे. असे अनेक दुबे आले नी गेले मुंबईसह महाराष्ट्र अखंड आहे, असं राऊत म्हणाले.