Koyta Gang Reel Stars Arrested By Buldhana Police: अनेक तरुण सोशल मीडियावर भाईगिरीचे व्हिडिओ बनवून इन्स्टाग्राम,फेसबुक सह इतर समाज माध्यमावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. बुलढाणा येथील आरोपी अमित बेंडवाल आणि आदित्य ऊर्फ शक्ती संजय देशमुख यांनी हातामध्ये कोयता फिरवत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल केलं होतं. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी आर्म ऍक्ट अन्वय गुन्हा दाखल करत त्यांनी अटक केली आहे.तसेच त्यांची भाईगिरी थांबावी म्हणून पोलिसांनी त्यांचं माफी मागतांनाचा व्हीडिओ काढला आहे. ज्यात दोन्ही तरुण माफी मागत असून अशे व्हिडिओ काढू नका असे आवाहन इतरांना करत आहे.