Without Ticket Passenger Created Ruckus At Thane Station: बोरिवली स्थानकात एका विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाने तिकीट तपासनिसांच्या कार्यालयात तोडफोड केल्यानंतर आता दोनच दिवसांनी महिला विनातिकीट प्रवाशाचा व्हिडीओ समोर येत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार व सोशल मीडियावरील चर्चेनुसार हा व्हिडीओ ठाणे येथील असल्याची चर्चा आहे मात्र लोकसत्ता याची पुष्टी करत नाही. यामध्ये विनातिकीट पकडले गेल्यावर एक महिला वाद घालताना रडताना दिसून येत आहे.