महाराष्ट्रात भाषिक वादाचा मुद्दा तापला आहे. त्यातही मुंबईतून मराठी-हिंदी वादाचे अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. नवी मुंबईतून असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. नवी मुंबई पालिकेतील हा व्हिडीओ असल्याची माहिती आहे. जन्म मृत्यू नोंदणी विभागातील कर्मचाऱ्याशी हा वाद मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.