रायगडच्या पालकमंत्रिवरून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात अजूनही रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केलं आहे. १५ ऑगस्टला रायगडमध्ये झेंडावंदनाचा मान गोगावलेंनाच मिळावा, अशी मागणी शिंदेंकडे करणार असल्याचं उदय सामंत म्हणाले. तर १५ तारिख येईपर्यंत मधल्या १२ दिवसात अनेक घडामोडी होऊ शकतात, असंही ते म्हणाले.