Mahesh Manjrekar: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा ५ ऑगस्टला वरळी येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार दिग्गज अभिनेते व लोकप्रिय मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना प्रदान करण्यात आला.महेश मांजरेकर जीवनगौरव पुरस्कार स्वीकारत असताना त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.