Kajol: काजोलला तिच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी ‘स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्विकारल्यानंतर काजोलने तिच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी काजोल म्हणाली, “आज माझा वाढदिवस आहे आणि आजच्या खास दिवशी माझा सन्मान करण्यात आला ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या मंचावर सगळे दिग्गज उपस्थित आहेत त्यांच्या हस्ते मला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला हे माझं भाग्य आहे. खरंतर मी नि:शब्द झाले आहे, मला काय बोलावं हे सुद्धा सुचत नाहीये, हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे माझी आई इथे माझ्याबरोबर आलीये. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मी तिची साडी नेसून आज या कार्यक्रमाला आलीये.