मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मुंबई महानगर पालिकेकडून त्यासंदर्भात कारवाई करण्यात आली. मुंबईतील कबुतरखाने बंद झाल्यानंतर त्यावर जैन समाजाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला. यासंदर्भात सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकही झाली. या बैठकीत राज्य सरकार या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मात्र, यानंतरही आज मुंबईच्या दादरमध्ये जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान यावर प्रतिक्रिया देताना स्थानिक आमदार महेश सावंत यांनी दादरचे वैभव पुसण्याचा प्रयत्न होतोय असे म्हटले आहे.