How Does a Pigeon Causes Health Issues: दादरचा कबुतरखाना, मागील काही आठवडे प्रचंड चर्चेत असलेला विषय. BMC तर्फे दादरच्या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून हा कबुतरखाना बंद करण्यात आला आणि त्यानंतर मुंबईतील विशेषतः दादरमधील जैन धर्मियांनी कबुतरांसाठी आंदोलन पुकारलं, दादर परिसरातील आंदोलन आज पेटलेलं असताना मुळात ज्या कारणाने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय झाला ते म्हणजे “कबुतरामुळे आरोग्याला निर्माण होणारा धोका” यात किती तथ्य आहे हे आज आपण प्रसिद्ध व ज्येष्ठ छाती विकारतज्ज्ञ डॉ. जलील परकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत..