Uddhav Thackeray: उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्ली दौऱ्यावर होते. दिल्लीमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.