अमेरिकेने भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ (आयात शुल्क) लादण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच एकूण ५० टक्के टॅरिफ भारताला द्यावा लागेल. या घोषणेनंतर देशातील आणि राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र डागण्यास सुरुवात केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील यासाठी
मोदींना जबाबदार धरलं आहे. हे बोलतानाच त्यांनी भाजपा आणि मोदींना घालवून टाका. १४० कोटी लोकसंख्येतून कोणीतरी पुढे येऊन देश चालवू शकतो, असंही ते म्हणाले.