सरकारची बंदी असतानाही ‘रॅपिडो’ बाइक टॅक्सी सुरू असल्याने कारवाईचा आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले होते. मात्र आता त्यांच्या पुत्राच्या पुढाकाराने होत असलेल्या प्रो-गोविंदा लीगसाठी ‘रॅपिडो’ कंपनीची स्पाॅन्सरशीप घेण्यात आली आहे.मंत्र्यांनी कारवाईचं नाटक करून स्पाॅन्सरशीप लाटल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.