Sanjay Raut vs Devendra Fadnavis: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांना ७ ऑगस्ट रोजी रात्री जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. या बैठकीसाठी राज्यातून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे नेते देखील सहभागी झाले होते. दरम्यान या बैठकीवेळी उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसवण्यात आल्याचा दावा शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. यावरून उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान याच बाबत काळ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हालाही ठाकरेंना शेवटच्या रांगेत बघून दुःख होतं अशा शब्दात प्रतिक्रिया दिली होती, यावर आज शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.