Aaditya Thackeray: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे हे आज मुंबईच्या वरळीतील कोळीवाड्यात आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. नारळी पौर्णिमेच्या दिवशी आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे वरळीत कोळीवाड्यात आमने-सामने आले. दोन्ही नेते आमने-सामने आल्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.