पुणे- मुंबई द्रुतगती एक्स्प्रेसवेवर वार्डनला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. वॉर्डनने बस चालकाकडून वाहतूक पोलिसांच्या सांगण्यावरून पैसे घेतल्याच्या आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. सोमवारी दुपारी उर्से टोलनाका येथे हा सर्व प्रकार घडला आहे. वाहतूक पोलिसांच्या वार्डनने बस चालकाकडून पाचशे रुपये घेतल्याचा आरोप नागरिकांनी आरोप केला होता.