महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी सोमवारी शिवसेना शिंदे गटाने अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय बैठकीचे आयोजन नाशिक येथील हॉटेल एक्स्प्रेस इन येथील सभागृहात केलं होतं. यावेळी दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता घुसल्यावरून हा झाल्याची माहिती आहे.