11 Year Old Govinda Dies Falling From Practice Dahi Handi: दहिहंडीचा सराव सुरू असताना सहाव्या थरावरून कोसळून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे नाव महेश जाधव असून दहिसरच्या केतकीपाडा येथे रविवारी रात्री ही दुर्घटना घडली. हा मुलगा नवतरुण मित्र मंडळ पथकातील सदस्य होता. याप्रकरणी सोमवारी दहिसर पोलीस ठाण्यात मंडळाच्या अध्यक्षाविरोधात निष्काळजीपणे कृती करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.