BJP Yuva Morcha Worker Killed in Bhiwandi: भिवंडीत भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षाची आणि त्याच्या भावाची कार्यालयात शिरुन निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हल्लेखोरांनी सपासप वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भिवंडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.