राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंगळवारी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. मंदिराचा गाभारा पाडण्याच्या बेतात सरकार आहे. विकास कामाला विरोध नाही, पण गरज नसताना गाभाऱ्याची तोडफोड का केली जात आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.