Kolhapur 21 Years Old Girl Commits Suicide in Hostel: कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील वस्तीगृहात २१ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सांगली जिल्ह्यातील सांगलीवाडी गावाहून परत येऊन तीनच दिवसात गायत्रीने आपल्या रूममधील पंख्याला ओढणीने गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं आहे. गायत्री रेळेकर असे मृत मुलीचे नाव आहे. गायत्रीचा मृतदेह जेव्हा शववाहिकेतून नेला जात होता तेव्हा तिच्याबरोबर राहणाऱ्या मैत्रिणींचा तसेच तिच्या कुटुंबीयांचा आक्रोश हा काळजाला घरं पाडणारा होता.