Dadar Kabutar Khana Protest By Maratha Ekikaran Samiti: कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आज मराठी एकीकरण समितीच्यावतीनं आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. जैन मुनींनी दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समितीच्यावतीनं उत्तर देण्यात येणार होतं. मात्र त्याआधीच मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांची धरपकड सुरु झाली आहे. त्यानंतर किती जैन आंदोलकांवर कारवाई केली ते सांगा असा सवाल आंदोलकांनी केला आहे. दादरचा कबूतरखाना कायमचा बंद झाला पाहिजे. तसेच कायदा न मानणारे पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आज दादर कबूतरखाना येथे मराठी एकीकरण समितीकडून आंदोलन पुकारण्यात आलं.