मार्मिकच्या ६५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावाली होती. यावेळी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. दिल्लीत भटक्या कुत्र्यांचा विषय पेटलेला असताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी याकडे लक्ष घालण्याचं आश्वसन दिलं आहे. याचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी न्यायालयाच्या उंबरठ्यात लोकशाही तडफडतेय, कधी प्राण सोडेल सांगता येत नाही त्यामुळे याकडेही लक्ष घाला असं म्हणत सरन्यायाधीशांना विनंती केली आहे.