मार्मिक साप्ताहिकाच्या ६५व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम बुधवारी मुंबईत पार पडला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान, या सोहळ्यात बहुचर्चित अशा द फोक आख्यानाच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. हे सादरीकरण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हा कार्यक्रमन नसून तुम्ही आम्हाला करून दिलेली जाणीव आहे, असं म्हणत सर्व कलाकारांचं कौतुक केलं.